RedInk Award To Sonali Shinde, Saam TV News Twitter/@mumbaipressclub
मुंबई/पुणे

RedInk Awards 2022: 'साम'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; सोनाली शिंदे यांना मुंबई प्रेस क्लबचा 'रेड इंक' पुरस्कार

RedInk Awards 2022: मुंबई प्रेस क्लबद्वारे दिला जाणारा 'रेड इंक पुरस्कार' यंदा साम टिव्हीच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांना देण्यात आला आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

RedInk Awards 2022: प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलं जातं. या चौथ्या आधारसंभाला मजबूत ठेवण्यासाठी आणि समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचा मुंबई प्रेस क्लबद्वारे सन्मान केला जातो. याच निमित्ताने साम टीव्ही वृत्तवाहिनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई प्रेस क्लबद्वारे दिला जाणारा 'रेड इंक पुरस्कार' यंदा साम टिव्हीच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे (Sonali Shinde) यांना देण्यात आला आहे. याआधी साम टीव्हीला प्रतिष्ठीत 'लाडली मीडिया' पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर आता सामच्या स्पेशल रिपोर्ताजसाठी रेड इंक पुरस्कार मिळाला आहे. (RedInk Awards 2022 for the category '𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 𝗮𝗻𝗱 𝗘𝗰𝗼𝗻𝗼𝗺𝘆 (𝗧𝗩)')

उत्कृष्ट पत्रकारितेसाठी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या हस्ते १२ विविध श्रेणीतील २२ पत्रकारांना रेड इंक पुरस्काराने गौरवण्यात आले. साम टीव्हीच्या (Saam TV News) पत्रकार सोनाली शिंदे यांचा भातशेतीच्या रिपोर्ताजसाठी रेड इंक पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर इंडी जर्नलचे वैभव वाळुंज आणि दी वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांना उत्कृष्ट राजकीय पत्रकारितेसाठी पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ संपादक आणि स्तभंलेखक टी. जे. एस. जॉर्ज यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल प्रेस क्लब ‘जर्नालिस्ट ऑफ इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत २५ टक्क्यांनी भातशेतीचे उत्पन्न घटले. यावर सोनाली शिंदे यांनी 'भातशेतीचा घास' हा रिपोर्ताज केला होता. व्यवसाय आणि अर्थव्यवस्था या श्रेणीत त्यांच्या या रिपोर्ताजची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सोबतच कला श्रेणीत बीबीसी मराठीचे नामदेव काटकर यांना पुरस्कार मिळाला. हेल्थ अॅण्ड वेलनेस या श्रेणीसाठी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला.  (Latest Marathi News)

मुंबई प्रेस क्लबच्या रेड इंक पुरस्काराचे शुक्रवारी (ता. १६) एनसीपीए सभागृहात वितरण झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण म्हणाले, देशातील लोकशाही व्यवस्था निकोप ठेवण्यासाठी पत्रकारांचे स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे आहे. न्यायापालिका आणि पत्रकारिता यांना स्वतंत्र ठेवण्याची गरज आहे. जर या दोन क्षेत्रात काही चुकीचे घडले, तर त्याचा परिणाम थेट लोकशाहीवर होतो. स्वातंत्र्य गमावलेला पत्रकार हा स्वातंत्र्य गमावलेल्या न्यायाधीशाएवढाच वाईट आहे, असे सांगत पत्रकारिता करताना प्रामाणिकता हेच सर्वात चांगले धोरण आहे, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे. (Maharashtra News)

रेड इंक पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांची यादी

गुन्हे वृत्त
टीव्ही - अनुराग द्वारी (एनडीटीव्ही)
प्रिंट - अंगना चक्रवर्ती (द प्रिंट)

व्यवसाय आणि अर्थव्यवस्था
टीव्ही - सोनाली शिंदे (साम टीव्ही)
प्रिंट- अनु अब्राहम (मातृभूमि)

महिला अधिकार, लैंगिक समानता
टीव्ही- ऐश्वर्या एस अय्यर (द क्विंट)
प्रिंट- सुकन्या शांथा (द वायर)

क्रीडा
टीव्ही- वंदना (बीबीसी न्यूज हिंदी)
प्रिंट- भव्य डोरे (मिंट लाउंज)

द बिग पिक्चर
टी. पी. सूरज (न्यू इंडियन एक्स्प्रेस)
द्वितीय पुरस्कार- जिन्स मायकेल (मलयाळा मनोरमा)

विज्ञान
प्रिंट - करिष्मा मेहरोत्रा (स्क्रॉल.इन)

राजकीय पत्रकारिता
टीव्ही - जुगल पुरोहित (बीबीसी न्यूज हिंदी)
प्रिंट- सिद्धार्थ वरदराजन (द वायर) आणि वैभव वाळुंज (इंडी जर्नल)

मानवाधिकार
टीव्ही- अरविंद वेणुगोपाल (मलयाळा मनोरमा)
प्रिंट- कीर्ति दुबे (बीबीसी वर्ल्ड)

लाइफस्टाइल आणि मनोरंजन
प्रिंट - जेन बोर्गेस (मिड डे)

हेल्थ आणि वेलनेस
टीव्ही - बरखा दत्त (मोजो स्टोरी)
प्रिंट- आत्रेयी धर (डाउन टू अर्थ)

पर्यावरण
टीव्ही- त्रिदीप कांती मंडल और डॉमनिक सवियो डेंगदोह (द क्विंट)
प्रिंट - सुश्मिता (द कारवां)

कला
टीव्ही- नामदेव अनंत काटकर (बीबीसी वर्ल्ड)
प्रिंट- विनय अरविंद (फिफ्टी टू)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT