साम टीव्हीच्या 'सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी' स्पेशल रिपोर्टला प्रतिष्ठीत 'लाडली मीडिया' पुरस्कार

Laadli Media Awards To Saam TV News: जेंडर सेन्सीटायझेशन म्हणजे लिंगसमभाव जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो.
Laadli Media Awards To Saam TV News
Laadli Media Awards To Saam TV NewsTwitter/@Laadli_PF
Published On

Laadli Media Awards 2022: पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लाडली मीडियातर्फे यंदाचा प्रादेशिक पुरस्कार साम टीव्ही वृत्तवाहिनीला (Saam TV News) मिळाला आहे. United Nations Fund for Population Activities या संस्थेतर्फे जेंडर सेन्सीटायझेशन म्हणजे लिंगसमभाव जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो.

साम वृत्तवाहिनीने "सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी" या शीर्षकाखाली अनेक स्पेशल रिपोर्टस् केले होते, ज्यात समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाचा प्रवास आणि त्यांची एकूणच वाटचाल दाखवण्यात आली होती. याची दखल घेत यंदाचा लाडली मीडिया पुरस्कारचा बहुमान साम टीव्हीला मिळाला आहे. २ नोव्हेंबर २०२२ ला बुधवारी हैदराबाद येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. (Laadli Media Awards 2022 Latest News)

हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठात हा पुरस्कार सोहळा झाला. साम टीव्हीच्या वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे (Sonali Shinde) यांनी सामच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. "सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी" या विशेष कार्यक्रमासाठी साम टीव्हीच्या अनेक प्रतिनिधींनी फील्डवर जाऊन मेहनत घेतली होती. यात, नवनाथ सकुंडे, संभाजी थोरात, अश्विनी जाधव केदारी, जयश्री भिसे मोरे, ओंकार कदम, दिनू गावित इत्यादी माध्यम प्रतिनिधींनी मोलाची भूमिका बजाबली. सोबतच व्हिडिओ जर्नालिस्ट, ग्राफिक्स टीम आणि इतर तांत्रिक सहाय्य करणाऱ्या सहकाऱ्यांचेही यात योगदान आहे.

पाहा व्हिडिओ -

दरम्यान, २ नोव्हेंबरला झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात United Nations Population Fund चे प्रतिनिधी श्रीराम हरिदास, मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सय्यद हसन, British Deputy High Commissioner Gareth Wynn Owen, 'लाडली मीडिया'च्या प्रमुख शारदा एल आणि ज्येष्ठ अभिनेत्री डॉली ठाकूर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com