Priyanka Deshmukh addressing media over the Powai Hiranandani clash and dismissal of security guards. saam tv
मुंबई/पुणे

सुरक्षारक्षकांचा आवाज उठवल्यानं गुन्हा दाखल; पवई हिरानंदानी परिसरातील देशमुखांच्या 'त्या' राड्यावर पत्नीचा मोठा खुलासा

Powai Hiranandani Clash: पवई हिरानंदानी हिंसाचार प्रकरणात नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रियांका देशमुख यांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी याप्रकरणी एकतर्फी कारवाईचा आरोप नितीन देशमुख यांच्या पत्नीने केलाय. सोसायटीच्या सदस्यांकडून त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप ही त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

मयूर राणे, साम प्रतिनिधी

पवई हिरानंदानी परिसरामध्ये काम करत असलेल्या 40 सुरक्षारक्षकांना अचानक बडतर्फ करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये झटापट झाली. याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता नितीन यांनी मारहाण करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. या संदर्भातील हा गुन्हा होता.

त्यानंतर नितीन देशमुख यांच्या विरोधात हिरानंदानी परिसरात रहिवासी एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येताच देशमुख यांच्या पत्नी प्रियंका देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांकडून एकतर्फी कार्यवाही केली गेली असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच सोसायटीमधील सदस्यांकडून आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचं सांगण्यात आलंय. यासोबतच 40 सुरक्षारक्षकांना बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी प्रियंका यांच्याकडून करण्यात आली आहे.

पवईतील सोसायटीमध्ये झालेल्या वादावर नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रियंका देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. 'माझ्या पतीने कोणतीही दडपशाही केली नसून, ते केवळ सेक्युरिटी गार्डच्या हक्कासाठी लढत होते,' असा दावा त्यांनी केला आहे. हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना १४ हजार आणि सुरक्षारक्षकांना १२ तासांसाठी केवळ ११ हजार पगार दिला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सोसायटीने सीसीटीव्ही फुटेज लपवल्याचा आणि पतीलाही मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आपल्या कुटुंबाला आणि लहान मुलांना सोसायटीत त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics:निवडणुकीपुरते वाद नंतर हम साथ-साथ; शिंदे-चव्हाणांसाठी फडणवीसांची 'डिनर डिप्लोमसी'

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

SCROLL FOR NEXT