DCM Eknath Shinde Shivsena Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबईत शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Mumbai Politics: गोरेगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. विभाग प्रमुखांसह २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिंदे गटाला मोठं खिंडार पडले.

Priya More

Summary -

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदेसेनेला मोठा धक्का

  • गोरेगावमध्ये २०० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

  • उमेदवारी आणि पदवाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

  • गणेश शिंदे आणि सोनल हडकर यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

संजय गडदे, मुंबई

मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली. मुंबईत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. गोरेगावमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं. उमेदवारी अर्ज देण्यावरून नाराज झालेल्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली. विभाग प्रमुखांसह सुमारे २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे दिले. पालिका निवडणुकीदरम्यान हा शिंदेसेनेसाठी सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षात नव्याने येणाऱ्यांना पदे देण्यात आली आणि उमेदवारी दिल्यामुळे गोरेगावमध्ये जुने शिवसैनिक नाराज झाले आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्याने शेकडो पदाधिकारी नाराज झालेत. प्रभाग क्रमांक ५४ शिवसेना शिंदे गटाकडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोपवल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली.

नाराज झालेल्या विभागप्रमुख गणेश शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर याठिकाणी पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. गणेश शिंदे यांच्यानंतर महिला उपविभाग प्रमुख सोनल हडकर यांनीही राजीनामा दिला. शाखा समन्वयक आणि २०० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला. स्थानिक कार्यकर्त्यांकडे वरिष्ठ नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या सर्वांनी केला. गोरेगावमध्ये शिंदे गटाची संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत असून याचा परिणाम थेट आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

या सामूहिक राजीनाम्यांमुळे गोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत होण्याची शक्यता असून प्रभाग ५१ मधील शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रेया गणेश शिंदे यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाच्या वर्षा स्वप्निल टेंभवलकर यांच्यावर थेट परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना शिंदे गट नेतृत्वाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT