Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...

Latur Muncipal Corporation 2025-2026 Election : भाजपाच्या लातूर शहर संघटन सरचिटणीस निखिल गायकवाड यांनी उमेदवारी न मिळाल्याने पदाचा राजीनामा दिला. नवीन नेत्यांच्या प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते नाराज असून पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे.
Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...
Latur Muncipal Corporation 2025-2026 ElectionSaam Tv
Published On
Summary
  • एबी फॉर्म डेडलाईन आज दुपारी ३ वाजेपर्यंत

  • लातूर भाजप शहर युनिटमध्ये तिकीट वाटपावरून असंतोष

  • संघटन सरचिटणीस निखिल गायकवाड यांचा राजीनामा

संदीप भोसले, लातूर

राज्यात येत्या १५ जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून यासाठी अनेक नेत्यांनी कामाला सुरुवात केली आहे. पक्षांचे जागावाटप झाले असून आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपला एबी फॉर्म भरता येणार आहे. बऱ्याच पक्षातील जुने नेते, कार्यकर्ते हे उमेदवारीची संधी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. वर्षानुवर्षे कामे करूनही नेते मंडळींना उमेदवारी न दिल्याने नेते मंडळींनी निदर्शने केलेली पाहायला मिळत आहे. अशातच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने भाजपाच्या लातूर शहर संघटनातील संघटन सरचिटणीस निखिल गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

लातूर महापालिकेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अगदी काही तास शिल्लक असताना भाजपातील नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपाच्या लातूर शहर संघटनातील संघटन सरचिटणीस निखिल गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिला. “काम करण्याचे फळ मिळाले, धन्यवाद” अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर टाकत राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...
Railway : रेल्वे प्रवासातील गर्दीचा ताण कमी होणार, २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये क्षमता दुप्पट करणार; काय म्हणाले रेल्वे मंत्री? वाचा

पक्षाकडून अचानक उमेदवारी न मिळाल्याने हा राजीनामा देण्यात आल्याची चर्चा आहे. निखिल गायकवाड हे भाजपाचे जुने व सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. मात्र महापालिकेच्या तोंडावर इतर राजकीय पक्षांमधून मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात दाखल झाल्याने, जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान आता या नाराजी नाट्यानंतर महापालिकेच्या खुर्चीवर कोणाचा शिलेदार बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com