MUMBAI CYBER FRAUD AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : तुम्हीही मोबाईलवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करताय? मुंबईत PSI ला लावला चुना; पाहा काय घडले

Mumbai Cyber Crime News : मुंबईत संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून दोन व्यवहारांत ₹78,765 लंपास झाले. खेरवाडी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत पोलिस उपनिरीक्षकाची ऑनलाइन सायबर फसवणूक

  • पोलिसांच्या खात्यातून ₹78,765 लंपास

  • खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल

  • फसवणुकीच्या पैशांचा आणि आरोपींचा माग काढण्यास सुरुवात

संजय गडदे, मुंबई

मुंबईत सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयास्पद लिंकवर क्लिक करणं एका पोलिस उपनिरीक्षकाला चांगलंच महागात पडलं. सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल 78 हजार 765 रुपये लंपास केले. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फसवणुकीमागील आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. व्ही. विरणोडकर (58) हे पोलिस उपनिरीक्षक असून मुंबईतील बॉम्बे हायकोर्टात प्रकरणांच्या कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यातून दोन संशयास्पद व्यवहार झाले. मात्र, त्यावेळी खात्यातून पैसे गेल्याची माहिती त्यांना मिळाली नव्हती.

दोन दिवसांनंतर, म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी पेट्रोल पंपावर पैसे देण्यासाठी त्यांनी मोबाईलमध्ये UPI उघडलं असता खात्यातील शिल्लक रक्कम कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने खात्यातील व्यवहार तपासले असता दोन अनोळखी व्यवहार झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. विरणोडकर यांनी यापूर्वी एका संशयास्पद लिंकवर क्लिक केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचा मोबाईल अचानक बंद झाला होता. त्यानंतर स्क्रीनवर ‘Emergency Calling’ असा संदेश दिसत होता. याच काळात सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन व्यवहार करत 78 हजार 765 रुपये काढून घेतले.

फसवणुकीची माहिती मिळताच विरणोडकर यांनी तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. 1930 सायबर क्राईम हेल्पलाइनच्या माध्यमातून फसवणुकीचे व्यवहार रोखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच, ज्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे, त्या खात्यांची माहिती पोलिसांनी संबंधित बँकांकडून मागवली आहे. विरणोडकर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, व्यवहारांचा माग काढण्याचं काम सुरू आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच बँक खाते, UPI, OTP किंवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास वेळ न दवडता 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तातडीने तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची शक्यता वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT