Mumbai police conducting security checks at railway stations after receiving a bomb threat call before Independence Day saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धमकीचा कॉल; रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकू!

Mumbai Police Receive Train Blast Threat: स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल आलाय. ट्रेनला बॉम्ब टाकण्याची धमकी कॉल द्वारे देण्यात आलीय. त्यानंतर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली.

Bharat Jadhav

  • स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना रेल्वे बॉम्ब धमकीचा कॉल आला.

  • कॉलमुळे काही काळ खळबळ उडाली आणि सुरक्षा वाढवण्यात आली.

  • पोलिसांनी तातडीने तपास करून परिसराची छाननी केली.

  • तपासात काहीही संशयास्पद निघालं नाही आणि कॉल खोटा ठरला.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

देशभरात ७९ व्या स्वातंत्र्यदिनाची जोमात तयारी केली जातेय. मुंबई शहरही आता नटले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा कॉल आलाय. या कॉलमुळे काही काळ खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सखोल छाननी केली असता काहीही संशयास्पद आढळले नाही.

रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलिसांना आलाय. अज्ञात व्यक्तीने ही धमकी देऊन कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. यापूर्वीही कॉल करणाऱ्याने अशा प्रकारचे खोटे (हॉक्स) कॉल करून पोलिसांची दिशाभूल केली होती. ही घटना लक्षात घेता, १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क ठेवली आहे. दरम्यान या एका कॉलमुळे आता मुंबई पोलीस हायअलर्टवर मोडवर आले आहे. पोलिसांकडून सर्वत्र योग्य ती काळजी घेतली जातेय.

धमकीचा कॉल आलेल्या फोन नंबरवर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो नंबर बंद जाऊ लागला. धमकीचा कॉल संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात आला होता. कॉल झाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, शोधाशोध सुरू केला. पण कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

राजधानी दिल्लीत मोठा बंदोबस्त

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संपूर्ण शहरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि स्वातंत्र्यदिनाचे मुख्य उत्सव स्थळ असलेल्या लाल किल्ल्याभोवती ११,००० सुरक्षा कर्मचारी आणि ३,००० वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT