Mumbai Police Issues Advisory For ICC Cricket World Cup 2023  Saam Tv
मुंबई/पुणे

Cricket World Cup 2023: वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषक सामन्यांसाठी मुंबई पोलीस सज्ज, मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर; VIDEO

Mumbai POlice वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषक सामन्यांसाठी मुंबई पोलीस सज्ज, मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर; VIDEO

Satish Kengar

Mumbai Police Issues Advisory For ICC Cricket World Cup 2023:

देशभरात विश्वचषकाचा थरार रंगला आहे. अशातच मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी केला आणि 21 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आगामी सामन्याच्या सुरक्षेबाबत सूचना जाहीर केल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार, चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच चाहत्यांना वानखेडे स्टेडियमच्या आत पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि कोणत्याही धातूच्या वस्तू न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनी अॅडव्हायझरीमध्ये प्रेक्षकांना कोणत्याही संशयास्पद वस्तूची माहिती मिळाल्यास जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यास सांगितले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विश्वचषक 2023 चे सामने वानखेडे स्टेडियमवर 21, 24 ऑक्टोबर, 2, 7 आणि 15 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तत्पूर्वी, मुंबई पोलिसांचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनीही माध्यमांशी बोलताना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली आहे.

वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेची टक्कर

विश्वचषकात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात नेदरलँड्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच पराभव ठरला. तसेच दिल्लीत इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला होता.  (Latest Marathi News)

आता विश्वचषकात शनिवारी दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येतील. 50 षटकांच्या विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा विक्रम 4-3 असा असला तरी यावेळी दक्षिण आफ्रिकेची कामगिरी चांगली झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT