file photo  saam tv
मुंबई/पुणे

लज्जास्पद! विदेश महिलेसमोर टॅक्सी चालकाचे अश्लील चाळे; धावत्या टॅक्सीमध्येच...

मुंबईतील अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईतील अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. योगेंद्र उपाध्याय असं अटक करण्यात आलेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असल्याचं समजतं. (Latest Marathi News)

मुंबईत (Mumbai) फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन महिलेला मुंबईतील टॅक्सी चालकाच्या कृतीचा विचित्र अनुभव आला. अमेरिकन महिलेने एक खासगी टॅक्सी बुक केली होती. प्रवास करताना टॅक्सी (Taxi) अंधेरी परिसरात पोहोचताच टॅक्सी चालकाने महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

कॅब (टॅक्सी)चालकाच्या या कृतीमुळे ती महिला चांगलीच गोंधळून गेली. महिलेला सुरुवातीला हा प्रकार काही समजला नाही. मात्र महिलेने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. लोक जमा झाले आणि त्याच काळात टॅक्सी चालक योगेंद्र उपाध्याय हा पळून गेला.

मात्र, अंधेरी पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आतच टॅक्सी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक केली. पोलिसांनी टॅक्सी चालका विरोधात भादवी कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला मिळते? कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Travelling During Periods : ट्रॅव्हलिंग करताना पीरियड्स आले? घाबरू नका; 'या' ५ स्मार्ट टिप्सने प्रवास होईल आरामदायी

अशी वेळ शत्रूवरही ये नये! बँकेला मृत्यूचा पुरावा हवा होता, भाऊ चक्क बहि‍णीचा सांगाडाच घेऊन आला

Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

SCROLL FOR NEXT