Maharashtra Weather : महाराष्ट्राचा पारा घसरला, थंडी वाढली; पण विदर्भात पावसाची शक्यता, पाहा कसं असेल आजचं तापमान

Maharashtra Weather Update Today News : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून जळगाव, धुळे येथे तापमान ८ अंशांवर घसरले आहे. निफाडमध्ये ८.२ अंशांची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता.
Maharashtra Winter Update News
Maharashtra Winter Update News AI image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रात थंडीचा जोर हळूहळू वाढत असून उत्तर महाराष्ट्रातील तापमान आठ अंशावर

  • जळगाव आणि धुळे येथे किमान तापमान आठ अंशांच्या आसपास नोंदवले

  • निफाडमध्ये ८.२ अंश, नाशिकमध्ये १० अंश आणि पुण्यात ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

  • सातारा आणि जेऊर येथे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहिले

राज्यात हळूहळू थंडी वाढू लागली असून उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा आठ अंशांच्या आसपास घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी आणि रात्री चांगलीच हुडहुडी भरत आहे. मध्य महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांमुळे गारठा कायम आहे. दुसरीकडे विदर्भातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने हवामानात बदल जाणवत आहे. राज्यातील हवामानात पुढील काही दिवस चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, जळगाव आणि धुळे येथे किमान तापमान आठ अंशांच्या आसपास नोंदवण्यात आले. निफाडमध्येही पारा ८.२ अंशांपर्यंत खाली आला आहे. नाशिकमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे या परिसरात पहाटेच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे.

Maharashtra Winter Update News
Death News : भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि जेऊर परिसरातही तापमान तुलनेने कमी राहिले. पुण्यात ११.२ अंश, तर जेऊर आणि सातारा येथे प्रत्येकी १२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील 'अक्वान' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra Winter Update News
Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

आजही विदर्भ आणि मराठवाड्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मात्र थंडी आणि तापमानातील चढ-उतार असे संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.