Mumbai News: मुंलुंड स्थानकावर ऐन गर्दीच्या वेळी बत्ती गुल; प्रवाशांवर अंधारात वाट शोधण्याची वेळ VIDEO

प्रवाशांना अंधारातच लोकलमध्ये चढावे आणि उतरावे लागत होते.
Mulund
MulundSaam Tv

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंलुंड स्थानकावर आज संध्याकाळी प्रवाशांना एका वेगळ्याचा अडचणीचा सामना करावा लागला. संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी मुलुंड स्थानकातील लाईट गेल्याने प्रवाशांना अंधारात आपली वाट शोधावी लागली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Mulund
Delhi Crime News : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती; मुलाच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

मुलुंड स्टेशनवर आज संध्याकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास बत्ती गुल झाली होती. जवळपास 25 ते 30 लाईट गेली होती. त्यामुळे प्रवाशांना अंधारातच लोकलमध्ये चढावे आणि उतरावे लागत होते. (Latest Marathi News)

Mulund
Pune Bus Fire : पुण्यातील चांदनी चौकाजवळ बसला भीषण आग; अग्निशमन दलाची २ वाहनं घटनास्थळी

संध्याकाळी नोकरी करणाऱ्यांची घरी जाण्यासाठी लगबग सुरु असते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती. अशात अपघात होण्याचा धोका देखील होता. मात्र सुदैवाने काही दुर्घटना झाली नाही. अर्ध्या तासात पुन्हा लाईट आल्याने प्रवाशांची काळजी मिटली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com