mumbai crime news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थ विक्रेत्याची 'नशा' उतरवली, २ कोटींचा माल केला जप्त

Mumbai Crime news: मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे नऊच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News:

मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे नऊच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आरोपीकडून तब्बल १०२८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ साठा जप्त केला आहे. अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे सुमारे २ कोटी ४ लाख रुपये एवढी किंमत आहे. (Latest Marathi News)

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा नऊच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला शिवडी परिसरातून अटक केली आहे. सलीम हरून रशीद खान (44 वर्षे) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आ

एमडी अंमली पदार्थ पुरवठा करणारा व्यक्ती अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक आरोपीस 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आर. ए. के. पोलीस ठाण्याच्या हददीत एमडी अंमली पदार्थाचा मोठा साठा एक व्यक्ती घेवून येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष नऊ यांना मिळाली होती. या माहितीवरून कक्ष ९ च्या पथकाने शिवडी परिसरातील आदमजी जीवाजी चाळ येथे सापळा रचून एका व्यक्तीस ताब्यात घेतले.

याप्रकरणी आरोपीस अटक करून आरोपी विरोधात गुन्हे प्रकटीकरण शाखेने कलम ८(सी), २२ (सी), २९ एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या आरोपीच्या विरोधात २ गुन्हे नोंद आहेत, त्यास मा. न्यायालयाने २५/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

सदर, यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, पो.नि सचिन पुराणिक, पो.नि दिपक पवार, स.पो.नि उत्कर्ष वझे, स.पो.नि महेंद्र पाटील, पो.ह. सुनिल म्हाळसंक, भिकाजी खडपकर, सचिन राऊत, महेश मोहिते, राहुल पवार, पो.शि. प्रशांत भुमकर, पो.ह.चा. अविनाश झोडगे, पो.ह. ना. चा. शशिकांत निकम यांच्या पथकाने पार पाडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT