Saam Tv Impact Saam Tv
मुंबई/पुणे

Saam Tv Impact : मुंबईच्या रस्त्यांवर तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी; मुंबई पोलिसांनी दिला दणका, पाहा VIDEO

Mumbai Police Action On Stun Viral Video : मुंबई पोलिसांनी काही स्टंटबाज तरूणांवर कारवाई केलीय. सामटीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनाने कारवाई केल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईतील रस्त्यांवर स्टंटबाजी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मुंबई पालिका तसंच सीएसएमटी स्थानकासमोर काही तरूणांनी स्टंटबाजी केली होती. काही रॅपर्सनी या स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर हा स्टंटबाजीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. सामटीव्हीने या व्हायरल स्टंटबाजीच्या व्हिडिओची बातमी दाखवली होती. या बातमीची दखल घेत मुंबई पोलिसांनी या तरूणांवर कारवाई केलीय.

मुंबई पोलिसांची तरूणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेसमोर स्टंटबाजी करणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे स्टंटबाजी करून स्वत:चा जीव धोक्यात घालणं देखील चुकीचं आहे. इतकंच नव्हे तर प्रशासकीय इमारतींमध्ये या तरूणांनी स्टंट केल्याचं दिसलं होतं. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्यावर कारवाई (Viral Video) केलीय. रस्त्यांवर, मुंबई पालिका तसंच सीएसएमटी समोर तरूणांनी हुल्लडबाजी केली होती. आता त्यांना परिणाम भोगावा लागत आहे.

स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल

महापालिका मुख्यालयाजवळ माकडासारख्या उड्या मारणं तरुणांच्या अंगलट आलंय. तरूणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सामटीव्हीने व्हायरल करताच आझाद मैदान पोलिसांनी केली कारवाई (Stunt Viral Video) केलीय. पहाटे तीनच्या सुमारास तरूणांनी ही स्टंटबाजी केली होती. महापालिका मुख्यालयाजवळ सेल्फी पॉइंटवरून उड्या मारणे, बस स्टॉपवर चढणं, सिग्नलवर टॅक्सीच्या टपावर बसून प्रवास करण्याचे प्रताप तरूणांनी केले होते. बेदरकारपणे सायकल चालवल्याचं देखील समोर आलं होतं.

सामटीव्हीच्या बातमीचा दणका

आता या स्टंटबाजांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे या स्टंटबाज तरूणांनी माफी मागितल्याचं देखील समोर आलंय. प्रशासकीय ठिकाणी देखील तरूण हुल्लडबाजी करत स्टंटबाजी (Saam Tv Impact News) करतात. त्यामुळे प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. स्टंटबाजीच्या नादात अनेक तरूण-तरूणींचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलंय. आता या सामटीव्हीच्या व्हायरल बातमीची मात्र पोलिसांनी दखल घेतलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT