Mumbai One app features and benefits Latest Marathi : महामुंबईची सफर आजपासून एकाच तिकिटावर करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'मुंबई वन ' या ११ सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी भारतातल्या पहिल्या अॅपची सुरूवात होणार आहे. मुंबईसह ठाणे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या शहरांच्या बसने, तिथून लोकलने, मग मेट्रो किंवा मोनो व तिथून पुन्हा मुंबईत 'बेस्ट'च्या बसने प्रवास केला तरीही त्यासाठीचे तिकीट एकत्र काढता येणार आहे. प्रत्येक प्रवास बदलाला स्वतंत्र तिकीट काढण्याची गरज नसेल, हे या अॅपचे प्रमुख वैशिष्ट्य असेल. (PM Modi Mumbai One launch details)
वसई-विरार, पालघर आणि कल्याणच्या पुढील भाग वगळून महामुंबईत कोणत्याही भागातून कुठेही सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना आता वेगळं तिकिट काढायचा त्रास संपलाय. महामुंबईतील प्रवासासाठी आता 'मुंबई वन ' हे अॅप आलेय. सीटी बस, लोकल, मेट्रो अथवा मोनो कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी एकच ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. 'मुंबई वन' चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे.
मुंबई वन ॲपमुळे प्रवाशांना अनेक लाभ होतील. या अंतर्गत अनेक सार्वजनिक परिवहन सेवा पुरवठादारांच्या सेवेचे तिकीट काढता येईल. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही. एकापेक्षा अधिक वाहतूक पर्यायांची गरज असलेल्या प्रवासासाठी एकाच बहुआयामी तिकिटाची उपलब्धता अशा सोयींचा समावेश आहे. या ॲपच्या माध्यमातून विलंब होत असेल तर त्याबद्दलची माहिती, पर्यायी मार्ग आणि अंदाजित आगमनाच्या वेळेबद्दल वास्तविक वेळेतील प्रवासाची माहितीही मिळू शकणार आहे. यासोबतच जवळपासची स्थानके, आकर्षक आणि महत्त्वाची ठिकाणे यांबद्दलची नकाशासह माहिती, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी आपत्कालीन वा आणीबाणीच्या घटनांची पूर्वसूचना देणाची सुविधाही यात आहेत. या सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी एकत्र उपलब्ध होणार आहे.
बीएमसी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिका यांची स्वतःची सार्वजनिक बससेवा आहे. एमएमआरडीएकडून गुंदवली-दहिसर-अंधेरी, मेट्रो २ अ, मेट्रो ७ या मार्गिका चालवल्या जातात. रिलायन्सकडून घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर मार्गावर मेट्रो चालवली जाते. एमएमआरसीएलकडन आरे जेव्हीएलआर-बीकेसी-कफ परेड या मार्गावर भुयारी मेट्रो ३ आणि सिडकोकडून नवी मुंबई मेट्रो चालवली जाते. त्याशिवाय चेंबूर ते सात रस्ता चौकादरम्यान मोनोरेलदेखील आहे. त्याशिवाय पश्चिम, हार्बर, मध्य लोकलसेवादेखील आहेच. सध्या या माध्यमातून प्रवास करायचा असल्यास प्रत्येकवेळा वेगवेगळे तिकिट काढावे लागते. पण 'मुंबई वन' (MUMBAI ONE) या अॅपवर प्रवासी वरील ठिकाणाहून प्रवासासाठी एकच तिकिट काढू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.