Nawab Malik Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Sameer Khan Accident: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, ICU मध्ये उपचार सुरु

Nawab Malik Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना झाली.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. १८ सप्टेंबर

Sameer Khan Accident Kurla: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली असून यामध्ये समीर खान हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना झाली असून त्यांच्याच गाडीच्या ड्रायव्हरमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. समीर खान हे कारमध्ये बसत असताना त्यांच्याच गाडीच्या चालकाकडून ॲक्सिलेटर दाबला गेल्याने समीर खान कारसोबत फरफटत गेले.

या दुर्घटनेत समीर खान यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खानदेखील सोबत होत्या. दुर्घटनेनंतर समीर खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी कारचालक अबुल अन्यारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या अपघातामध्ये काही दुचाकीही चिरडल्याचे सांगण्यात येत आहे. समीर खान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून या अपघातामध्ये निलोफर खान यांच्याही हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातप्रकरणी कारचालकाला ताब्यात घेतले असून विनोबा भावे पोलीस स्टेशन याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

Rule Change : १ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल

SCROLL FOR NEXT