Bandra- Madgaon Express Saam Tv
मुंबई/पुणे

Bandra- Madgaon Express : कोकणात जायला आणखी एक ट्रेन, थांबा कुठे? तिकीट किती? जाणून घ्या वेळापत्रक

Bandra- Madgaon Express Ticket Price And More Details: वेस्टर्न रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना थेट वांद्रे येथून कोकणामध्ये जाता येणार आहे. ३ सप्टेंबरपासून मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस सेवा सुरू झाली आहे.

Priya More

गणेशोत्सव आणि होळी म्हटलं म्हटलं की कोकण आलंच. गणेशोत्सव आणि होळीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मुंबईमध्ये नोकरीनिमित्त आलेले कोकणवासीय दरवर्षी गणपतीला आणि होळीला कोकणामध्ये जातात. या सणांच्या काही महिने आधीपासूनच त्यांची कोकणात जाण्यासाठी तयारी सुरू होते. बऱ्याचदा कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नसल्यामुळे अनेकांची गैर सोय होते. रेल्वे, एसटी बस, ट्रॅव्हल्सद्वारे नागरिक कोकणात जातात. पण बुकिंग फुल्ल झाल्यामुळे बऱ्याचदा त्यांना तिकीट मिळत नाही. दरवर्षी कोकणात जाणारे नागरिक जास्तीत जास्त गाड्या कोकणामध्ये सोडण्याची मागणी करत असतात. अशामध्ये रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत त्यांना गणेशोत्सवापूर्वी गुड न्यूज दिली.

आता वेस्टर्न रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना थेट वांद्रे येथून कोकणामध्ये जाता येणार आहे. २९ ऑगस्टपासून मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस सेवा सुरू झाली आहे. वसई-पनवेलवरून कोकणामध्ये ट्रेन जाणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे ही रेल्वेसेवा फक्त गणेशोत्सवापूर्ती मर्यादीत राहणार नाही तर ती कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. ही मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस मुंबईतून आठवड्यातून दोन वेळा सुटणार आहेत.

३ सप्टेंबरपासून मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना कोकणामध्ये जाण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर येण्याची गरज नाही. त्यांना आता पश्चिम रेल्वे मार्गावरूनच कोकणामध्ये जायला मिळणार आहे. मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेकडून चालवण्यात येणार आहे. या ट्रेनमुळे मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या ट्रेनमुळे वांद्रेपासून ते

वसई-विरार, बोरीवलीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे कोकणामध्ये जाणारी ही मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस बुधवार आणि शुक्रवारी वांद्रे रेल्वे स्थानकावरून सुटेल तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरूवारी सुटणार आहे.

वांद्रेवरून सुटणाऱ्या ट्रेनचा थांबा आणि वेळ -

- वांद्रे टर्मिनसवरून सकाळी ६.५० वाजता ही ट्रेन सुटेल.

- बोरिवली रेल्वे स्थानकावर ७.२३ वाजता पोहचेल.

- वसई रोड रेल्वे स्थानकावर ७.५० वाजता पोहचेल. (वसई रोडला २५ मिनिटं थांबेल)

- भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर ८.५० वाजता पोहचेल.

- पनवेल रेल्वे स्थानकावर ९.५५ वाजता पोहचेल.

- रोहा रेल्वे स्थानकावर ११.१५ वाजता पोहचेल. (इथे ५ मिनिटं थांबेल)

- वीर रेल्वे स्थानकावर १२ वाजता पोहचेल.

- चिपळूण रेल्वे स्थानकावर १.२५ वाजता पोहचेल.

- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ५.३५ वाजता पोहचेल. (इथे ५ मिनिटं थांबेल)

- कणकवली रेल्वे स्थानकावर ६ वाजता पोहचेल.

- सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर ६.२० वाजता पोहचेल.

- सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर ७ वाजता पोहचेल.

- थिविम रेल्वे स्थानकावर ८ वाजता पोहचेल.

- करमाळी रेल्वे स्थानकावर ८.३० ला पोहचेल.

- मडगाव रेल्वे स्थानकावर १० वाजता पोहचेल.

मनमाडवरून सुटणाऱ्या ट्रेनचा थांबा आणि वेळ -

- मडगाववरुन वांद्रे टर्मिनससाठी ही ट्रेन सकाळी ७.४० वाजता सुटेल.

- करमाळी रेल्वे स्थानकावर ८.१० वाजता पोहचेल.

- थिविम रेल्वे स्थानकावर ८.३२ वाजता पोहचेल.

- सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर ९ वाजता पोहचेल.

- सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर ९.३६ वाजता पोहचेल.

- कणकवली रेल्वे स्थानकावर ९.५० वाजता पोहचेल.

- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर १.३० वाजता पोहचेल.

- चिपळूण रेल्वे स्थानकावर ३.२० वाजता पोहचेल.

- वीर रेल्वे स्थानकावर ५.३० वाजता पोहचेल.

- रोहा रेल्वे स्थानकावर ६.४५ वाजता पोहचेल.

- पनवेल रेल्वे स्थानकावर ८.१० वाजता पोहचेल.

- भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर ९.०५ वाजता पोहचेल.

- वसई रोड रेल्वे स्थानकावर १०.०५ वाजता पोहचेल.

- बोरिवली रेल्वे स्थानकावर १०.४३ वाजता पोहचेल.

- वांद्रे टर्मिनसला ११.४० वाजता पोहचेल.

अशी आहे ट्रेन -

मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेसला एकूण 20 डबे आहेत. यामध्ये सेकंड स्लीपरचे ८ डबे, थ्री टायर एसीचे ३ डबे, थ्री टायर एसी इकॉनॉमीचे २ डबे, टू टायर एसीचा १ डबा, जनरलचे ४ डबे, एसएलआरचा १ डबा, पँट्री कारचा १ डबा, जनरेटर कारचा १ डबा यांचा समावेश आहे.

तिकीट किती?

वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर स्लीपर डब्याने प्रवास करणाऱ्यांना तिकीटासाठी ४२० रुपये मोजावे लागणार आहेत. एसी थ्री टियर इकोनॉमीसाठी १०५० रुपये, एसी थ्री टियरसाठी ११३५ रुपये, एसी २ टियरसाठी १६२५ रुपये रुपये इतके पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT