Mumbai Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईतील या भागात उद्या पाणीपुरवठा बंद, तुमच्या परिसराचा यात समावेश आहे का?

Mumbai Water Cut At 30 Aug 2024: मुंबई महानगर पालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ च्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनींच्या दुरूस्तीचे काम पालिका प्रशासन करणार आहे.

Priya More

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील २ भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ च्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनींच्या दुरूस्तीचे काम पालिका प्रशासन करणार आहे. या कामामुळेच उद्या वांद्रे आणि खार परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामं हाती घेतली आहे. या कामाअंतर्गत पाली हिल जलायश १ ची जीर्ण आणि जुन्या झालेल्या जलवाहिन्यांची दुरस्ती केली जाणार आहे. त्याचसोबत वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 दरम्यान नव्याने टाकलेल्या 750 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ही दोन्ही कामं उद्या म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत केली जाणार आहेत. या कामांमुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. एच पश्चिम विभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी उद्या होणाऱ्या कामाची नोंद घेऊन पाण्याचा जपून वापर करावा आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.

पेरी परिक्षेत्र -

वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग या भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.

खार दांडा परिक्षेत्र -

खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग या भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेच्या काही भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Ladki Bahin Yojana: सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, कोकणासह घाटमाथ्यावर कोसळणार जोरदार पाऊस

Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

SCROLL FOR NEXT