Mumbai Dam Water Level Status Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये किती टक्के पाणीसाठा? वाचा आजची आकडेवारी

Mumbai Rain And Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा धरण काठोकाठ भरले आहे. सातही जलाशयांमध्ये किती टक्के पाणासाठा जमा झालाय ते घ्या जाणून...

Priya More

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा आता ७८ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन या सातही धरणातील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा धरण काठोकाठ भरले आहे. सातही जलाशयांमध्ये आतापर्यंत ७८.४० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ७८.४० टक्के इतका झाला आहे. ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ११,३४,७३६ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ७८.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,०७,१८१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ७६.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणजेच मागच्यावर्षीच्या तुलनेत या धरणातील पाणीसाठा जास्त आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यामधील तुलसी, विहार, तानसा, मोडकसागर ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये असलेली पाणीकपात बीएमसीने रद्द केली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ५०.९४ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.२६ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ८३.१३ टक्के पाणीसाठा

- भातसा - ७६.६४ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT