मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मुंबईतील सर्व भागात लोकांच्या घराघरात गणपती विराजमान होत आहेत. या गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कुर्ल्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पूर्व भागात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीला आग लागल्यानंतर रहिवांशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील सवेरा या रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील घरांना ही आग लागली.
इमारतीला आग लागल्यानंतर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या इमारतीला आग नेमकी कशी लागली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
मुंबईतील कुर्ला पूर्व येथील एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावर असलेल्या डकमध्ये ही आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये एकच भीती पसरली. आगीच्या घटनेनंतर उपस्थित मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारत रहिवाशांना खाली उतरवलं. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटात इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर डकला लागलेली आग ही सोळाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं.
मुंबईतील परळमध्ये कमला मिल कंपाऊंडनजीक असलेल्या टाईम्स टॉवरला शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही. टाईम्स टॉवरच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याची अंदाज अनेकांनी वर्तवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.