Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray Video: वरळीत चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही, आदित्य ठाकरेचा भाजपवर निशाणा

Aditya Thackeray Criticized BJP: वरळीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून फुटबॉलच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली.

Priya More

वैदेही कानेकर, मुंबई

'वरळीत कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही.', असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे. वरळीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून फुटबॉलच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी नीट परीक्षा गोंधळ (NEET Exam Scam), त्यांच्यासोबत वरळी मतदारसंघावरून भाजपवर निशाणा साधला.

वरळी मतदारसंघामध्ये इतर पक्षाची लोकं येऊ लागली आहेत. याप्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, 'मी निवडणूक लढवताना म्हणालो होतो की वरळी सीट कशी आहे बघायला सगळे येतील. वरळी ए प्लस होताना सगळीकडून लोकं येतात. मी त्यांचे स्वागत करतो. मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा अशी मी विनंती करतो. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी याठिकाणी कमळ येऊ देणार नाही.', असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

नीट परीक्षेच्या गोंधळावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, 'महाराष्ट्राचे राजकारण दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात लूट चालली आहे. देशात देखील तिच परिस्थिती आहे. नीट परीक्षा, नेट परीक्षा आणि सीईटीचा मुद्दा आम्ही उचलून धरला आहे. परीक्षेवर चर्चा व्हायला पाहिजे. आज भाजप फक्त कोण कोणत्या धर्माचा, कोण कोणत्या जातीचा आहे. समाजाता काय चालले आहे यावर बोलत आहे. पण आज तरुण पिढी ज्या समस्येला तोंड देत आहे त्यावर कोणी चर्चा करत नाहीये. भाजप भूतकाळाविषयी बोलते आम्ही भविष्याबद्दल बोलतो.', असे म्हणत त्यांनी भाजपलाच धारेवर धरले.

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की , 'काल सीईटीचे ३ डायरेक्टर आले होते उत्तर द्यायला. पण त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. त्यांनी निर्लज्यपणे सांगितले मागच्या वर्षी ४० चूका होत्या आणि यावर्षी ५४ चुका झाल्यात. चुका करणाऱ्यांना सस्पेंड केले पाहिजे. सीईटीच्यांनाच पैसे कमवायला मिळाले आहेत. हे पैसे रिफंड होणार आहे की नाही. उत्तर पत्रिका हातात का नाही देत. त्या पाहायला का मिळत नाही. यामध्ये पारदर्शकता पाहिजे. कोणीच काही विचारत नाही. पर्सेटेंज दिले तसे मार्क्स सांगा आणि उत्तर पत्रिका दाखवा.'

तसंच, 'डायरेक्टर बदलून काही होणार नाही. मंत्री बदलले पाहिजे. पहिल्यांदा मंत्र्यांनी सांगितले होते की काहीच गडबड नाही. नंतर म्हणाले काही गडबड असू शकते. नंतर परीक्षेला २४ तास शिल्लक होते तेव्हा परीक्षाच रद्द केली. लाखो विद्यार्थ्यांचे पैसे कोण देणार, नुकसान झाले त्याची भरपाई कोण देणार. वन नेशन वन पोल म्हणतात. पण एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही. मला वाटते ही परीक्षा कदाचित निवडणूक आयोगच करत आहे. नीट परीक्षेबाबत जो कोणी दोषी आहे त्यावर कारवाई व्हायलाच हवी.', अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT