Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Jan akrosh Morcha: 'शिवसेनाच हिंदूंची शेवटची आशा...' भाजपच्या जनआक्रोश मोर्चावर संजय राऊतांचा हल्लाबोल

हिंदूच राज्य आलं असं सांगूनही स्वतःला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही म्हणून आक्रोश मोर्चा निघत आहे," अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: मुंबईत सकल हिंदू समाजाने विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिंदे गट आणि भाजपचे नेतेही सहभागी झाले आहेत.

या मोर्चावर बोलताना संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Sanjay Raut)

काय म्हणाले संजय राऊत..

"हिंदूच राज्य आलं असं सांगूनही स्वतःला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही म्हणून आक्रोश मोर्चा निघत आहे," अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे,

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी "हिंदूचे राज्य असताना काश्मीर पंडिताना न्याय मिळावा म्हणून आक्रोश करतायत न्याय मागतायत, आठ वर्षापासून मोदी शहा यांच राज्य आलंय त्यांना न्याय मिळाला नाही," अशीही टीका राऊतांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना "उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचे कारण नाही, आजही हिंदुवर गोळ्या झाडल्या जातायत, मुलायम सिंग यादव यांना पुरस्कार दिला जातोय यासाठी हा आजचा आक्रोश आहे,ठ अशी खरमरीत टीका राऊतांनी केली आहे.

त्याचबरोबर "आम्ही वाटत बघत होतो कि बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांना भारतरत्न दिला जाईल पण ज्यांनी राम सेवकांवर गोळ्या झाडल्या यांना पुरस्कार दिले जातायेत,"असा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, "शिवसेना भवनासमोर येऊन आक्रोश करतायेत त्याच कारण म्हणजे शिवसेना म्हणजे हिंदुंची शेवटची आशा आहे हे समजून घ्यावं" असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

SCROLL FOR NEXT