India Alliance Protest Saamtv
मुंबई/पुणे

India Alliance Protest: 'इंडिया' आघाडीचा मोर्चा अडवला; पोलीस- आंदोलक आमनेसामने; मुंबईत काय घडतंय?

India Alliance Protest: विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत पदयात्रा काढण्यात आली.

Gangappa Pujari

Mumbai News:

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीकडून मुंबईमध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे. 'मैं भी गांधी' असे नाव दिलेल्या या पदयात्रेत मोठा गोंधळ झाला असून पोलिसांकडून हा मोर्चा अडवण्यात आला. त्यामुळे आंदोलक- पोलीस आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून महात्मा गांधी (Gandhi Jayanti 2023) यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत (Mumbai) पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आणि ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले.

परंतु पोलिसांकडून या पदयात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही या मोर्चा निघाल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बोलण्याचे प्रयत्न केले. मात्र कोणत्याही परिस्थितीत पदयात्रा करण्याच्या भूमिकेवर नेते ठाम होते. त्यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले.

वर्षा गायकवाड संतापल्या..

या संपूर्ण प्रकारानंतर मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी संताप व्यक्त केला. माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पदयात्रेत पोलिसांनी दंडेलशाही सुरू केली असून हा प्रकार ब्रिटीशराजची आठवण करुन देणारा असल्याचे त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT