महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात नसावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे . सुरुवातीला शुभम लोणकर उर्फ शुब्बू याने बिष्णोईच्या नावावर या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले होते.
लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या व्यक्तीने अद्याप या हत्या प्रकरणावर काहीही सांगितले नाही. त्यामुळेच या प्रकरणात बिष्णोई गँगच्या सहभागावर पोलिसांना संशय आहे. याआधी कोणत्याही घटनेमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्यास त्यांच्या गँगशी संबंधित लोकं उघडपणे घटनेची जबाबदारी स्वीकारत होते किंवा नकार देत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत. महत्वाचे म्हणजे लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींनी या प्रकरणी अद्याप काहीही सांगितलेले नाही. लॉरेन्सचा भाऊ अनमोल असो, त्याचा सहकारी रोहित गोदारा असो किंवा आता कॅनडात स्थायिक झालेला गोल्डी ब्रार असो सिद्दीकी खून प्रकरणावर सगळे जण बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर मौन बाळगून आहेत. या सर्वांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहेत.
यावर्षी एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हा अनमोल बिश्नोईने त्याची जबाबदारी स्वीकारली होती. याशिवाय आणखी एक गोष्ट जी पोलिसांच्या सिद्धांताला पोषक ठरते ती म्हणजे शुभम लोणकरची पार्श्वभूमी. शुभम लोणकर पुण्याचा आहे. जो मराठी शाळेतून बारावी उत्तीर्ण झाला असून त्याचे हिंदी आणि पंजाबी भाषेतील प्रभुत्व फारच कमी आहे. यामुळे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलेला मजकूर अन्य कोणीतरी लिहून शुभम लोणकरला पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. पोलिस सध्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.