Mumbai Police Died In Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू, एलफिन्स्टन ब्रिजवरील घटना

Mumbai Police Died In Accident: मुंबईतल्या एलफिन्स्टन ब्रिजवर (Elphinstone Bridge) पोलिसाच्या बाईकला अपघात झाला होता. या अपघातामध्ये पोलिसासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला होता.

Priya More

Mumbai Police Death:

मुंबईमध्ये एका तरुण पोलिस कॉन्स्टेबलचा (Mumbai Police Constable) रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या एलफिन्स्टन ब्रिजवर (Elphinstone Bridge) पोलिसाच्या बाईकला अपघात झाला होता. या अपघातामध्ये पोलिसासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला होता. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणाचा तपास भोईवाडा पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास एलफिन्स्टन ब्रिजवर एका अज्ञात वाहनाने पोलिस कॉन्स्टेबलच्या बाईकला धडक दिली होती. धनराज घाग असं या २५ वर्षीय कॉन्स्टेबलचे नाव होते. धनराज एल ए विभागात कार्यरत होते. या अपघातामध्ये धनराज यांच्यासह त्यांच्या बाईकवरून प्रवास करणारा मित्र देखील गंभीर जखमी झाला होता. त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या धनराज आणि त्यांच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान धनराज यांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. धनराज घाग यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT