Mumbai MGM Hospital News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : एमजीएम रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांची पळापळ

नावात आणि चेहऱ्यात साम्य असल्याने एका व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचा प्रकार रुग्णालयात घडला.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टिव्ही

Mumbai News : कामोठे येथील एमजीएम रुणालयातून (Mumbai) एक धक्कादायक प्रकास उघडकीस आला. नावात आणि चेहऱ्यात साम्य असल्याने एका व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचा प्रकार रुग्णालयात घडला. मृतदेहाची अदलाबदल झाल्याने चांगलीच धांदल उडाली. अंत्यविधीची तयारी पूर्ण झालेली असतानाच मृतदेह बदली झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. त्यानंतर पुन्हा रुग्णालय प्रशासनाकडून मृतदेहांची अदलाबदल करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

अलिबाग येथील पेझारी गावात राहणाऱ्या रमाकांत पाटील नामक व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा रमाकांत यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मंगळवारी दिवसा मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. रात्रभरासाठी रमाकांत पाटील यांचे शव रुग्णालतील शीतगृहात ठेवण्यात आले.

दरम्यान, याचवेळी शीतगृहात पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील राम पाटील यांचा देखील मृतदेह ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी पेझारी गावचे मयत रमाकांत पाटील यांचे नातलग शीतगृहातील मृतदेह घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांना राम पाटील यांना मृतदेह देण्यात आला.

दोघांच्या नावात आणि चेहऱ्यातही साम्य असल्याने शीतगृहातील कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने पेजारी येथील रमाकांत पाटील आणि सोमटणे येथील राम पाटील यांच्या मृतदेहाची अदला बदल झाल्याची माहिती उघड झालेय. राम पाटील यांच्या नातेवाईकांना याची कल्पना आली आणि त्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाला सदर बाब निदर्शनास आणून दिली.

पेझारी येथे घेऊन जाण्यात आलेल्या मृतदेहाच्या अंतिमसंस्कारची तयारी पूर्ण झालेली असतानाच मृतदेह बदली झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाल्यानंतर पुन्हा मृतदेहांची बदली करण्यात आली. एमजीएम रुग्णालय प्रशासनाकडून मात्र या घटनेला खोडून काढत मृतदेह बदली झाल्याचा प्रकार शीतगृहातच लक्षात आल्याने तात्काळ चुक सुधारण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: पोलिस कॉन्स्टेबल असताना अपमान झाला, नोकरी सोडली, स्वाभिमानासाठी केली UPSC क्रॅक; उदय कृष्ण रेड्डी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT