Amit Shah News: अमित शहांना 'स्टॉक मार्केट'बाबत केलेलं वक्तव्य भोवणार! इंडिया आघाडी करणार सेबीकडे तक्रार; काय आहे प्रकरण?
Amit Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Amit Shah News: अमित शहांना 'ते' वक्तव्य भोवणार? INDIA आघाडी करणार सेबीकडे तक्रार; काय आहे प्रकरण?

Gangappa Pujari

रुपाली बडवे| मुंबई, ता. १८ जून २०२४

लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तक्रारी वाढणार असल्याचे दिसत आहे. आज इंडिया आघाडीचे खासदार सेबीकडे यासंबंधी अमित शहा यांच्याविरोधात सेबीकडे तक्रार दाखल करणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या निकालापुर्वी शेअर बाजारात चढ- उतार पाहायला मिळत होते. शेअर मार्केटच्या या घसरणीबाबत अमित शहा यांनी मोठे वक्तव्य केले होते. याचा निकालाशी काही संबंध नाही, ४ जून नंतर बाजारात तेजी राहील, असा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.

याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान किंवा राजकीय नेत्यांनी पहिल्यांदाच शेअर मार्केटबाबत विधान केल्याचा आरोप करत याबाबत सेबीच्या चौकशीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीचे खासदार सेबीकडे तक्रार दाखल करणार आहेत.

तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crop Insurance: पीक विमा भरताना आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकृत होतील

Ladki Bahin Yojana News: सर्व्हर डाऊन, लाडकी बहीण हतबल!

Maharashtra Live News Updates: वाहन चालकांच्या पत्नीला लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या; मनसेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Ajit Pawar-Nawab Malik Special Report: दादांचं ठरलं, मलिकांचं काय? मलिकांच्या एण्ट्रीनं महायुतीची कोंडी?

Third Mumbai : 'तिसरी मुंबई नकोच', काय आहे हा प्रोजेक्ट आणि या नागरिक का करतायत विरोध? वाचा...

SCROLL FOR NEXT