Mulund Accident News: Saamtv
मुंबई/पुणे

Mulund Hit And Run: मुलुंडमध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार! अलिशान कारने गणपती मंडळाच्या सदस्यांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू

Mulund Accident News: याचवेळी अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असतांना यादोघांना जोरदार धडक दिली.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. ७ सप्टेंबर २०२४

Mulund Hit And Run: राज्यभरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच मुलूंडमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुलुंड मध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कार ने रस्त्यावर बॅनर लावणारया दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर बीएमडब्ल्यू कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रितम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. याचवेळी अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असतांना यादोघांना जोरदार धडक दिली.

धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही, तो मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. या या अपघातात प्रितम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सध्या कार आणि फरार चालकाचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

SCROLL FOR NEXT