Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रणकंदन; विधानसभेआधीच अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडिओ

ajit pawar on mahayuti chief minister face : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रणकंधन सुरु झालं आहे. विधानसभेआधीच अजित पवारांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रणकंधन; विधानसभेआधीच अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडिओ
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. अजित पवारांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांचा धडाका लावला आहे. एकीकडे अजित पवारांच्या सभा सुरु असताना दुसरीकडे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर अजित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे.

अजित पवार हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, 'आम्ही पहिल्यापासून सांगत आहे की, राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. कारण नसताना विरोधक वेगळा आणि गैरप्रचार करतात. वास्तविक राज्याचं हित जिथं असतं. त्यावेळेस राज्याचा विचार केला पाहिजे. तिथं राजकीय दृष्टीकोनातून पाहिलं नाही पाहिजे. पण दुर्देव आहे. त्यांना कळलं की, यांच्या काळात जास्त गुंतवणूक होते, त्यामुळे लोक फार विचार करणार नाही'.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रणकंधन; विधानसभेआधीच अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडिओ
CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट की विधानसभा निवडणुका वेळेत होणार? काय म्हणाले CM शिंदे?

'पहिल्यांदा महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील, यासाठी महायुतील तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. पण आताच्या निवडणुकाला सामोरे जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहोत. जास्तीत जास्त आमदार निवडून आणल्यानंतर पुढचा विचार तिन्ही पक्ष करतील, असे ते पुढे म्हणाले.

अजित पवारांनी काल एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत महायुतीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. महाविकास आघाडीसारखं महायुतीतही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सारंकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत रणकंधन; विधानसभेआधीच अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडिओ
Ambegaon News : शरद पवार-अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मंत्र्यांसमोरच राडा, VIDEO

दरम्यान, शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातच निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली आहे. तसेच निकालानंतरही मुख्यमंत्री शिंदेंच नेतृत्व करणार असल्याचा दावा केला आहे. फडणवीसांनीही शिंदे गटाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असला तरी निकालानंतर कोण चेहरा असेल, याचा निर्णय दिल्लीत होईल, असं सांगून अजितदादांनाही दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com