Ambegaon News : शरद पवार-अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मंत्र्यांसमोरच राडा, VIDEO

Pune News : आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याचा वार्षिक सभेत अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील व त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते.
Pune Ambegaon News
Pune Ambegaon NewsSaam tv
Published On

आंबेगाव (पुणे) : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा आज होती. या सभेत शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचे पाहण्यास मिळाले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील त्यांच्यासमोरच हा सगळा राडा झाला.

आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याचा वार्षिक सभेत अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील व त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते. यावेळी आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही. बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला. हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले; असा आरोप देवदत्त निकम यांनी केला. या मुद्द्यांवरून वळसे पाटील आणि निकमांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान मंत्री वळसे पाटलांनी शांततेचं आवाहन केले. मात्र सभेत वेगवेगळ्या कारणांवरून राडा सुरूच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत देवदत्त निकम यांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. 

Pune Ambegaon News
Ahmednagar Crime : घरांना बाहेरून लावल्या कड्या, दरोडेखोरांचे भयानक कृत्य; वस्तीवर प्रचंड दहशत

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप 

मात्र देवदत्त निकम यांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले आहेत. विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजून विघ्नसंतुष्ठीपणा निकामांनी केल्याचा पलटवार करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत गदारोळ करून काय साध्य केलं. उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळरावांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com