Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात आता मिळणार या सुविधा?

Mumbai News Update : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात इतर उपचारांबरोबरच कान, नाक, घसा यावरही आधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत.

Sandeep Gawade

Mumbai News

मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात इतर उपचारांबरोबरच कान, नाक, घसा यावरही आधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. यासाठी महापालिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे खरेदी करत असून येत्या दोन ते तीन महिन्यांत ही उपकरणे रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेने १७ नोव्हेंबर २०२२ पासून शहर आणि उपनगरात ‘आपला दवाखाना’ सुरू केला होता. आतापर्यंत महापालिकेने सुमारे २२६ दवाखाने आणि पॉलिक्लिनिक सुरू केले आहेत. आतापर्यंत ३० लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. रुग्णांचा चांगला प्रतिसाद पाहून महापालिका आपला दवाखान्यातील सुविधा वाढवत आहे. याअंतर्गत तीन आपला दवाखान्यांमध्ये फिजिओथेरपिस्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता दवाखान्यात ईएनटी सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार रुग्णांचे नाक, कान आणि घसा आधुनिक उपकरणांनी तपासण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या चाचणीत मोठा आजार आढळून आल्यास त्यांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ईएनटी सुविधेसाठी उपकरणे खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. ही उपकरणे येत्या दोन महिन्यांत काही दवाखान्यांमध्ये पोहोचवली जातील.

शून्य प्रिस्क्रिप्शनची प्रतीक्षा

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १ एप्रिलपासून झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लागू करण्यात येणार होती. सर्व औषधे सर्व रुग्णांना उपलब्ध करून द्यायची होती; परंतु लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. आता यासाठी मुंबईकरांना आचारसंहिता संपेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMPML : श्री क्षेत्र देहू- भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ; दिवसभरात मारणार सात फेऱ्या

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT