Shruti Vilas Kadam
बेसन, पाणी, कांदा, हिरवी मिरची, लसूण, हळद, मीठ, तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर पिठल्यासाठी घ्या. भाकरीसाठी ज्वारी/बाजरीचे पीठ आणि पाणी ठेवा.
बेसनात पाणी घालून गाठी न राहता मध्यम घट्ट पीठ तयार करा. त्यात हळद व मीठ मिसळा.
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्या.
तयार बेसनाचे मिश्रण फोडणीत ओता. सतत ढवळत मध्यम आचेवर पिठलं घट्ट होईपर्यंत शिजवा.
शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला. आवडीनुसार थोडे पाणी घालून पातळ किंवा घट्ट ठेवा.
पीठ पाण्यात भिजवून मळा. गोळा करून हाताने थापून तव्यावर भाजा. दोन्ही बाजूंनी छान भाजली की भाकरी तयार.
गरमागरम पिठलं-भाकरीसोबत ठेचा, लोणचं किंवा कांद्याची कोशिंबीर दिल्यास चव दुप्पट वाढते.