Mumbai News : मुंबईतील नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्याचे काम किती पूर्ण झालं? महत्वाची अपडेट आली समोर

Mumbai latest News : पालिकेकडून आतापर्यंत लाख ८६ हजार ३८ मेट्रिक म्हणजे ४७.६० टक्के गाळ काढण्यात आला आहे. महापालिकेने ३१ मे २०२४ पर्यंत नाल्यातील गाळ काढण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे.
BMC
BMC Saam Digital

मुंबई : पावसाळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. महापालिकेचं यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ६८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दीष्ट आहे. पालिकेकडून आतापर्यंत लाख ८६ हजार ३८ मेट्रिक म्हणजे ४७.६० टक्के गाळ काढण्यात आला आहे. महापालिकेने ३१ मे २०२४ पर्यंत नाल्यातील गाळ काढण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे.

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून छोट्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यास मदत मिळते. त्यामुळे पालिकेचा गाळ उपसण्यावर भर असतो. पालिकेकडून यंदा १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तर आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे ४७.६० टक्के गाळ काढण्यात आला आहे.

BMC
Maharashtra Politics 2024 : माढ्यात भाजपचा बी प्लान तयार; २५ वर्षांपासूनचे कट्टर विरोधक येणार एकत्र

दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्चच्या पहिल्या आठड्यात कामे सुरु करण्यात आली आहेत. गाळ काढण्याची सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे निर्देश प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. तसेच मुंबई शहरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी ३१ मे २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

आतापर्यंत काढण्यात आलेल्या गाळाबाबतचा सविस्तर तपशील

मुंबई शहर विभाग

विविध नाल्‍यांमधून ३० हजार ९४० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १० हजार ४४० मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ३३.७४ टक्‍के आहे.

पूर्व उपनगर

विविध नाल्‍यातून १ लाख २३ हजार ५५३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ५९ हजार ३४४ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४८.०३ टक्‍के आहे.

BMC
Raj Thackeray: ...कोणताही पुरावा नाही, २००८ मधील हिंसाचार प्रकरणातील राज ठाकरेंविरोधातील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

पश्चिम उपनगर

विविध नाल्‍यातून २ लाख ३५ हजार ०२१ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. पालिकेकडून आतापर्यंत ९९ हजार ८०२ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४२.४७ टक्‍के आहे.

मिठी नदी

मुंबईतील मिठी नदीतून २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजार ८०८ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ६७.४५ टक्‍के आहे.

मुंबईतील लहान नाले

मुंबईतील सर्व लहान नाले मिळून ३ लाख ६३ हजार ५३३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १ लाख ४९ हजार २३० मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४१.०५ टक्‍के आहे.

महामार्गांलगतच्‍या नाल्‍यांमधून एकूण ५२ हजार ५६० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २१ हजार ७५२ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४१.३९ टक्‍के आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com