Srikant Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

Srikant Shinde News: ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन; भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांकडून स्वागत

Thackeray vs Shinde: श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिलेल्या अंधेरी वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केलं.

साम टिव्ही ब्युरो

Thackeray vs Shinde: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शाखा संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आज श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिलेल्या अंधेरी वर्सोवा विधानसभा मतदारसंघाला भेट दिली.

यावेळी भर पावसात शिंदे गटातील (Eknath Shinde) शेकडो कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांचं जल्लोषात स्वागत केलं. वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक 59 च्या वतीने खासदार गजानन कीर्तिकर यांनी श्रीकांत शिंदे यांना कोळी टोपी देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी प्राचार्य अजय कौल, शिवसेना प्रवक्ता नरेश मस्के, युवा नेते सिद्धेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला.

कोरोना काळात केलेला भ्रष्टाचार ,विविध रस्त्यांच्या कामांमधील भ्रष्टाचार , मुंबईतील खड्डे अशा अनेक विषयांवरून शिंदेंनी विरोधकांवर तोफ डागली. ज्या समस्या महाविकासआडीने सोडवल्या नाही, त्या समस्या आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवतील असे आश्वासन देखील त्यांनी नागरिकांना दिले.

दरम्यान, ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे दाखल होताच शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह संचारला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शिंदे गटाकडून शाखा संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानात रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांसह शहर आणि उपनगरात रखडलेले झोपडपट्टी तसेच म्हाडाचे पुर्नविकास प्रकल्प, संक्रमण शिबीरातील रहिवाशांचे होणारे हाल, क्लस्टर योजनेतील अडथळे यासारख्या मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात या संपर्क अभियानाची व्याप्ती ठरवून वाढवली जात आहे.

मुंबई (Mumbai News) महानगर प्रदेशातील ठाणे, कल्याण, डोंबिवली नवी मुंबई या मोठ्या शहरांमध्ये शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला अद्याप तितकासा धक्का देण्यात शिंदे यांना यश आलेले नाही. ठाकरेंची मुंबईत मोठी ताकद आहे. या ताकदीला धक्का देण्यासाठी शिंदे यांनी आता मुंबईत शिवसेना शाखा संपर्क अभियानाला सुरुवात केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT