Mud In Shivaji Park Due To Rainfall Saam Tv
मुंबई/पुणे

Dussehra Melava: ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला पावसाचा फटका, शिवाजी पार्कवर चिखलच चिखल; पाहा VIDEO

Mud In Shivaji Park Due To Rainfall: मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा फटका ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला बसण्याची शक्यता आहे.

Priya More

मुंबईतल्या दादर येथील शिवाजीपार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळवा होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या मेळाव्याला मोठ्यासंख्येने राज्य भरातील शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यासाठी सर्व तयारी व्यवस्थितपणे करण्यात आली आहे. मात्र मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाने जोर धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात याठिकाणी मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस वातावरण असेल राहिल आणि पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. अशामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्क येथे चिखल झाले आहे. याच शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या पावसामुळे दसरा मेळाव्याला फटका बसण्याची शक्यता आहे. या मेळाव्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले पण पावसामुळे शिवाजी पार्कवर चिखल साचला आहे. त्यामुळे या सर्वाचा सामना करत ठाकरे गटाला मेळावा पार पाडावा लागणार आहे.

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवतिर्थावर आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदुत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे.

ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असणार आहे. शिवतीर्थवर येणाऱ्या साधारण ६० हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. ऐवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येणार आहेत. जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण सर्वांना ऐकता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नव कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

Maharashtra Live News Update: दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT