Mumbai News Congress 3 former corporators resign may join Shivsena Eknath Shinde Group ssd92 SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! तीन माजी नगरसेवकांचे तडकाफडकी राजीनामे; नेमकं कारण काय?

Mumbai Congress News: मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी ,गंगा माने, बबु खान यांनी राजीनामा दिले आहेत.

Rashmi Puranik

Mumbai Congress Latest News: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीत एनडीएला कोंडीत पकडण्यासाठी इंडिया आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. अशातच मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

मुंबई काँग्रेसमधील (Mumbai Congress) नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. या नाराजीची चर्चा सुरू असताना मुंबईतील ३ माजी नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याची माहिती आहे.

आता हे माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई काँग्रेसने एक बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसमधील काही पदाधिकारी तसेच नेते अनुपस्थित होते.

यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. याचाच परिणाम म्हणून आता मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी ,गंगा माने, बबु खान यांनी राजीनामा दिले आहेत. तर पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT