Aditya Thackeray criticizes CM Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईतील रस्ते रखडवणाऱ्या कंत्राटदाराचा करार अखेर रद्द; आयुक्तांच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचे CM शिंदेंवर टीकास्त्र

Mumbai Latest News: कामे रखडवणाऱ्या वादग्रस्त कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, अशी शिफारस रस्ते विभागाने पालिका प्रशासनाकडे केली होती.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Mumbai Breaking News:

मुंबई शहर भागातील रस्त्याची कामे रखडवणाऱ्या वादग्रस्त कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, अशी शिफारस रस्ते विभागाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. या प्रस्तावाला अखेर मंजुरी देऊन हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रासोबत महापालिका आयुक्त हे समझोता करू इच्छित नाही हे यातून स्पष्ट होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हणले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार्यादेश दिल्यानंतर 10 महिने उलटूनही काम सुरू न केल्यामुळे दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्यांच्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्याच्या प्रस्तावाला बीएमसीने बुधवारी मंजुरी दिली आहे. रस्ते कॉंंक्रिटीकरणाच्या कामासाठी एकूण 1687 कोटी रुपयांचे कंत्राट या संबंधित कंत्राट दाराला देण्यात आलं होते.

मात्र १० महिने उलटुनही हे काम सुरु झाले नव्हते. संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते मात्र कंत्राटदार सुनावणीसाठी हजर राहिला नाही. अखेर हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच काम सुरू करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल RSIIL ला 52 कोटी रुपयांच्या दंडालाही सामोरे जावे लागणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य ठाकरेंनी केली टीका...

दरम्यान, या निर्णयानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट करत शिंदे सरकारवर टीका केली आहे. "जानेवारी २०२३ पासून, मी दर महिन्याला प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईवर थेट नियंत्रण मिळवलेल्या 'मिंधे-भाजप' राजवटीत मुंबईला सर्व बाजूंनी लुटण्याची कशी योजना आखली गेली आहे ह्याबद्दल सातत्याने आवाज उठवत आहे," असे आदित्य ठाकरेंनी म्हणले आहे.

तसेच "अखेर काल माझ्या ट्विटनंतर, आयुक्तांनी दक्षिण मुंबई रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराचा करार संपुष्टात आणण्यासाठी फाइलवर स्वाक्षरी केली आहे. आमच्या ट्विट आणि पूर्वीच्या पत्रकार परिषदांनी हे सुनिश्चित केलं, की मुंबई आयुक्त बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रासोबत समझोता करण्यात काहीही मदत करू शकणार नाहीत," असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT