Santacruz Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: मुंबईतल्या सांताक्रुझमध्ये भीषण अपघात, चार वाहनांचा चक्काचूर; चौघे गंभीर

Santacruz Accident: सांताक्रुझ परिसरामध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला. कलिना युनिव्हर्सिटीसमोरील उड्डाण पुलावरून वेगाने खाली जाणाऱ्या डंपरने चार वाहनांना जोरदार धडक दिली.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या सांताक्रुझमध्ये भरधाव डंपरने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास बीकेसी पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ परिसरामध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला. कलिना युनिव्हर्सिटीसमोरील उड्डाण पुलावरून वेगाने खाली जाणाऱ्या डंपरने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन कार आणि दोन रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघतामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींपैकी दोन जणांना व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका व्यक्तीला लीलावती रुग्णालय दाखल करण्यात आले. तर चौथ्या जखमी व्यक्तीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT