14 Dogs Killed In Kandivali Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: खळबळजनक! १४ कुत्र्यांची हत्या करून नाल्यात फेकलं, कांदिवलीतील धक्कादायक घटना

14 Dogs Killed In Kandivali: कांदिवली पश्चिम येथील मंगलमयी इमारतीजवळील नाल्यात १४ कुत्रे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील कांदिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवली पश्चिम येथील मंगलमयी इमारतीजवळील नाल्यात १४ कुत्रे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुत्र्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप श्वानप्रेमींनी केला आहे. कांदिवली येथील रहिवासी हिना लांबाचिया यांनी याबाबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील साईनगर मंगलमय इमारत परिसरात आणि सोसायटीमध्ये अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. सोसायटीमधील नागरिकांकडून या भटक्या कुत्र्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केली जाते. मात्र यातील अनेक भटके कुत्रे गायब झाल्यासंदर्भातील माहिती सोसायटीतील रहिवासी हिना लांबाचिया यांना समजली. लांबाचिया यांनी या भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना इमारती समोरील नाल्यात गोणीमध्ये काही कुत्र्यांचे मृतदेह दिसून आले. लांबाचिया यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला.

या घटनेसंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केला असता या गोण्यांमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह सापडले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीची एक चित्रफीतही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. मृत कुत्र्यांचे मंगळवारी म्हणजे आज शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT