Girls Organs Save Lives Of 4 Kids Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : आई-वडिलांना सॅल्यूट! १२ वर्षीय मुलगी ब्रेन डेड; किडनी, यकृत, हृदय दान करण्याचा निर्णय, चौघांचा जीव वाचवला!

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबईत एका १२ वर्षाच्या मुलीने आपले अवयवदान केल्यामुळे ४ चिमुकल्यांचे प्राण वाचल्याचं समोर आलंय. सांताक्रूझच्या एका कुटुंबाने आपल्या १२ वर्षांच्या मुलीचे अवयव दान केलेत. यामुळे इतर चार चिमुकल्यांना जीवदान मिळालंय. या १२ वर्षीय मुलीला सोमवारी १५ जूलै रोजी परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय (Mumbai News) घेतला. अखेरच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या चार मुलांचे प्राण या मुलीने तिच्या मृत्युनंतर वाचवले आहेत.

मृत्यूनंतर केले अवयव दान

याबाबत सविस्तर वृत्त असं की, वैदेही तानावडे असं अवयवदान करणाऱ्या मुलीचं नाव आहे. वैदेही ९ वर्षांची होईपर्यंत अगदी ठणठणीत होती. परंतु त्यानंतर नेहमीच तिच्या प्लेटलेट्स कमी होत होत्या. सप्टेंबर २०२० मध्ये तिला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक नावाचा गंभीर आजार असल्याचं निष्पन्न (Organ Donation) झालं. त्यानंतर तिच्यावर वाडिया रूग्णालयात उपकार करण्यात आले होते. परंतु आराजामुळे वैदेही खूपच अस्वस्थ झाली होती.

वैदेहीचे अवयव दान केले

वैदेहीला १३ जुलै रोजी सकाळी अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तिला पुन्हा वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांना सीटीस्कॅनमध्ये तिच्या डोक्यात रक्तस्त्राव दिसून (What Is Organ Donation) आला. डॉक्टरांनी वैदेहीचा मेंदू मृत झालं असल्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांनी वैदेहीचे अवयवदान करून इतर गरजू लोकांचे प्राण वाचविण्याचे आवाहन वैदेहीच्या पालकांना केलं.

४ मुलांना जीवदान मिळालं

एक किडनी वाडिया हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आलीय. तर दुसरी किडनी केईएम हॉस्पिटलमध्ये (How To Donate Organ) गेलीय. तिचे यकृत ग्लेनीगल हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आलंय, तर तिचे हृदय चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे. वैदेहीचे पालक सुपरहिरो आहेत, त्यांनी मुलगी गमावून देखील समाजासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याची प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटलच्या डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिलीय. वाडीया हॉस्पिटलमधील मागील २ वर्षातील हे तिसरे बाल अवयवदान असल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT