Nanded Mumbai Vande Bharat Saam tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Express: मुंबईहून सुटणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक बदललं, आता आणखी ३० मिनिटे वाचणार

Nanded Mumbai Vande Bharat Express New Timetable: नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. आता प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

Siddhi Hande

नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अजून सुसाट धावणार

३० मिनिटांचा वेळ वाचणार

छत्रपती संभाजी नगरहून येणाऱ्यांची २० मिनिटे वाचणार

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन आहे. आता वंदे भारत ट्रेन आणखी सुसाट होणार आहे. हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या ट्रेनचा वेळ आता कमी करण्यात येणार आहे. या एक्सप्रेसचा वेग वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेळ ३० मिनिटांनी कमी करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

नांदेड-मुंबईत वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढल्याने छत्रपती संभाजी नगरहून येणाऱ्या प्रवाशांनी २० मिनिटे वाचणार आहे. आता ही एक्सप्रेस ताशी ३० किमी वेगाने धावणार आहे. हे नवीन वेळापत्रक ३ मेपासून लागू होणार आहे.

नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे दररोज अनेकजण मुंबईचा प्रवास करतात. वंदे भारत (20705/20706) एक्सप्रेसमुळे हा प्रवास सोपा झाला आहे. आता या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नांदेडहून मुंबईला येण्यासाठीचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार आहे. यासाठी मनमाडमधील धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस आणि हिंगोली-मुंबई जनशताब्दीच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे वंदे भारत एक्सप्रेस अधिक वेगाने धावणार आहे.

देशातील ५३ रेल्वेमार्गांवर प्रति तास १३० किमी वेगाने धावणाऱ्या एक्सप्रेस चालवण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये जालना-मनमाड मार्गाचा समावेश आहे. एक्सप्रेसचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅक, पॉइंट्सचे मजबुतीकरण अशा गोष्टींवर भर देण्यात आला. त्यानंतर आता हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस १३० किमी प्रति तास वेगाने धावेल. सध्या ही ट्रेन १०० किमी वेगाने धावते.

वेळापत्रक (Nanded-Mumbai Vande bharat)

हजूर साहिब नांदेड- सकाळी ५.२०

परभणी-सकाळी ६.००

जालना- सकाळी ७.३३

छत्रपती संभाजी नगर-सकाळी ८.२३ मिनिटे

मनमाड - सकाळी१०.१०

कल्याण- दुपारी १.१० मिनिटे

ठाणे-दुपारी १.३० मिनिटे

दादर- दुपारी १.५०

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दुपारी २.१५ मिनिटे

परतीच्या एक्सप्रेसचं वेळापत्रक

मुंबईहून पुन्हा नांदेडला जाणारी एक्सप्रेस १.१० ऐवजी १.१५ वाजता निघेल. ही ट्रेन छत्रपती संभाजी नगरला ६.५ मिनिटांनी पोहचणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६.५५ वाजता निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT