Mumbai mahanagarpalika result winning candidates full list : देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. आतापर्यंत २१२ जागांवरील कल समोर आले आहेत. यामध्ये महायुतीने सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर पार केला आहे. महायुतीचे उमेदवार ११७ जागांवर आघाडीवर आहेत. तर ठाकरे बंधूंची गाडी ७३ वर पोहचली आहे. काँग्रेसने १३ जागांर आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, मुंबईत भाजपची सत्ता येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत मुंबईत अनेकांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजप, शिवसेना अन् काँग्रेसच्या आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी पाहूयात..
मुंबईतील आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवाराची यादी -
207 रोहिदास लोखंडे - भाजपा
165 अश्रफ आझमी - काँग्रेस
33 मोईन सिद्दिकी - काँग्रेस
2 तेजस्वी घोसाळकर - भाजपा
135 नवनाथ बन - विजयी
1 रेखा यादव - शिवसेना शिंदे
1 रेखा यादव - शिवसेना शिंदे
215 संतोष ढोले - भाजपा
214 भाजपाचे - अजय पाटील
19 प्रकाश तावडे - भाजपा
50 विक्रम राजपूत - भाजपा
50 विक्रम राजपूत - भाजपा
123 सुनिल मोरे - शिवसेना ठाकरे
20 दीपक तावडे - भाजपा
207 रोहिदास लोखंडे - भाजपा
124 सकिना शेख शिवसेना -ठाकरेसेना
32 गीता भंडारी - शिवसेना ठाकरे
182 मिलिंद वैद्य - शिवसेना ठाकरे
87 पूजा महाडेश्वर - शिवसेना ठाकरे
73 लोना रावत - शिवसेना ठाकरे
145 खैरुनिसा हुसेन - एम आय एम
103 हेतल गाला - भाजपा
172 राजश्री शिरवाडकर - भाजप
33 अस्लम शेख यांची बहीण विजयी , काँग्रेस
9 शिवानंद शेट्टी - भाजपा
52 प्रीती साटम भाजप
37 योगिता कदम - ठाकरे सेना
134 मेहजबीन खान - एमआयएम
173 शिल्पा केळुस्कर - भाजप
104 प्रकाश गंगाधरे - भाजप
53 जितेंद्र वळवी - ठाकरे सेना
200 उर्मिला पांचाळ - ठाकरे सेना
59 फणसे - ठाकरे सेना
विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि दिग्गज नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपत प्रवेश केला. याचा फटका ठाकरेंना निवडणुकीत बसल्याचे चित्र आहे. निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. मुंबईत ठाकरेंचे ६४ उमेदवार आघाडीवर आहेत, तर मनसेचे ९ उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेसने १५ जागांवर बाजी मारली आहे. दुसरीकडे एकट्या भाजपने ९३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदेंची शिवसेना २४ जागांवर आघाडीवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.