Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत गेल्या 5 वर्षात सदोष विद्युत प्रणालीमुळे 20 हजाराहून अधिक आगीच्या दुर्घटना, बीएमसीची माहिती

आगीच्या दुर्घटनांपैकी जवळपास 75 टक्के दुर्घटना या सदोष विद्युत प्रणालीमुळे घडल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत -

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात अनेकदा आगीच्या दुर्घटना घडतात. यामागे विविध कारणं असतात. मात्र, गेल्या पाच वर्षांत झालेल्या आगीच्या दुर्घटनांपैकी जवळपास 75 टक्के दुर्घटना या सदोष विद्युत प्रणालीमुळे घडल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. हे धक्कादायक आहे (Mumbai Municipal Corporation write to Government for audit of electrical system to reduce the risk of fire incidents).

गेल्या पाच वर्षात, सदोष वीज प्रणालीमुळे 20 हजारांहून अधिक आगीच्या दुर्घटना (Fire Incidents) घडल्या आहेत. त्यामुळे आता जास्त मजल्याच्या इमारतींमधील (Building) अग्निप्रतिबंधक यंत्रणेच्या तपासणीव्दारेच विद्युत प्रणालीचं नित्यनियमानं लेखापरीक्षण (Audit) करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यासाठी पालिकेनं (BMC) राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या मुख्य विद्युत निरीक्षकांना पत्रही पाठवलंय.

गेल्या पाच वर्षांत मुंबईत (Mumbai) एकूण 26 हजार 855 आगीच्या दुर्घटनांपैकी 20 हजार 009 ठिकाणी सदोष विद्युत यंत्रणेमुळे (Faulty Electrical System) आगीच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 किंवा मुंबई महापालिका अधिनियम 1888 मधील तरतुदीनुसार विद्युत प्रणालींचं नियतकालिक लेखापरीक्षण करण्याची तरतूद नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. ती व्हावी यासाठी विद्युत प्रणालीच्या लेखापरीक्षणासाठी पालिकेने सरकारला पत्र लिहिलंय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT