मुंबईमध्ये ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात झाला.
मुलुंड टोलनाक्याजवळील पुलावर ही घटना घडली.
अपघातामध्ये सर्व कारचे मोठे नुकसान झाले.
कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन् सर्व वाहनं एकमेकांवर आदळली.
मुंबईमध्ये भयंकर अपघताची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या मुलुंड टोलनाक्याजवळ ७ ते ८ वाहनं एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सर्व वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे मुलुंड टोलनाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नंतर वाहनं बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवण्यात आली. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर आज सकाळच्या सुमारास ७ ते ८ वाहनांचा विचित्र उपघात झाला. मुलुंड टोल नाक्याजवळील ब्रिजवर ७ ते ८ कार एकमेकांवर जोरदार धडकल्या. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामध्ये सर्वच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुढे असणाऱ्या कारने अचानक ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून भरधाव येणाऱ्या कार एकमेकांवर धडकल्या. अपघातग्रस्त कारच्या पुढील आणि पाठील भागांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या अपघाताचा तपास त्यांनी सुरू केला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी सर्व वाहनं बाजूाला काढली. या अपघातानंतर काही वाहन चालकांनी चक्रार दाखल करण्यासाठी नवघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी वाहनचालकांनी तक्रार दाखल केली असून पोलिस सध्या तपास करत आहेत. या अपघतामध्ये नेमकी चूक कुणाची आहे याचा पुढील तपास नवघर पोलिस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.