Bhayandar Accident: ओव्हरटेक करताना घात झाला, भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू

Bhayandar Flyover Dumper Accident: भाईंदर पश्चिमेकडील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.
Bhayandar flyover accident: Zepto delivery boy crushed to death under dumper
Bhayandar flyover accident: Zepto delivery boy crushed to death under dumperSaam Tv
Published On

भाईंदर पश्चिमेकडील उड्डाणपुलावर दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा युवक भाईंदर पूर्वेकडून पश्चिमेकडे येत असताना डंपरखाली चिरडला गेला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने डिलिव्हरी बॉय थेट डंपरच्या मागच्या टायरखाली गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Bhayandar flyover accident: Zepto delivery boy crushed to death under dumper
Maharashtra Politics: कर्जतमध्ये अजितदादांचा डाव; भाजप, शिवसेनेला मोठा धक्का; दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.तसेच या अपघाताचा पोलिस अधिक तपास करत आहे.

Bhayandar flyover accident: Zepto delivery boy crushed to death under dumper
Dhangar Protest: ...तर फसवणाऱ्यांची घरं जाळा, सरकार खबरदार नसेल तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा, या धनगर नेत्याचं चिथावणीखोर वक्तव्य

फोनवर प्रेयसीसोबत गप्पा मारत असताना अपघात

आज दिल्ली येथील द्वारका येथे एक भीषण अपघात घडला असून एका कार चालकाने बस स्टँडजवळ उभ्या असलेल्या दिल्ली परिवहन महामंडळाच्या 6 कर्मचाऱ्यांना चिरडले. या अपघातात सर्व सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालक त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होता. तो बोलण्यात इतका दंग होता की त्याने बोलण्याच्या नादात थेट समोर असलेल्यांच्या अंगावर गाडी घातली.

Bhayandar flyover accident: Zepto delivery boy crushed to death under dumper
Navratri Festival: 'माय म्हणी अंबा माय! नवरात्रीत सप्तश्रृंगी गडावर धावणार जादा बसेस; कुठून अन् किती असतील बसेस, काय असतील दर?

मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात

तीन दिवसापूर्वी रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला होता. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना धडक दिली होती. हा भीषण अपघात हातखंबा गावात घडला होता. या अपघातात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. या अपघातात ट्रकने चार कार आई तीन दुचाकीसह एका रिक्षाला धडक दिली होती. ज्या गाड्यांना धडक दिली त्यामध्ये एका आरटीओ विभागाची गाडीचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com