एकेकाळी म्हाडाचं घर सर्वसामान्यांसाठी आधार होतं. मायानगरीत स्वत:चं घर असावं असं स्वप्न बाळगणा-यांची स्वप्नपूर्ती म्हाडानं केली आहे. मात्र आता स्थिती बदलली आहे.
म्हाडाची घर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहीली नाहीत. हे वास्तव आहे. कारण म्हाडानं जाहीरात काढलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. तब्बल 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत किंमत आहेत. ताडदेवमधील उच्च गटासाठीच्या घराची किंमत सर्वाधिक म्हणजे साडेसात कोटींवर आहे.
या लॉटरीअंतर्गत गोरेगाव, मालाड, जुहू, अॅन्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, ताडदेव अशा विविध ठिकाणी घर उपलब्ध होणार आहेत. 2,030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. अर्ज नोंदणीला सुरुवातही झाली आहे. 13 सप्टेंबरला सोडत निघणार आहे.
स्थळ उत्पन्न गट किंमत
अॅन्टॉप हिल अत्यल्प गट 51 लाख 41 हजार
विक्रोळी अल्प गट 67 लाख 13 हजार
मालाड अल्प गट 70 लाख 87 हजार
गोरेगाव मध्यम गट 1 कोटी 11 लाख 94 हजार
पवई मध्यम गट 1 कोटी 20 लाख 13 हजार
पवई उच्च गट 1 कोटी 78 लाख 71 हजार
ताडदेव उच्च गट 7 कोटी 52 लाख 61 हजार
म्हाडाच्या घरांच्या या किंमती पाहून तुमचे डोळे विस्फारले असतील. अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे यंदा किती अर्ज येतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.