Pune MHADA News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Lottery New Rules : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने नियमात केला महत्वपूर्ण बदल, वाचा सविस्तर

Mhada Lottery New Rules 2024 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. म्हाडाने नियमात महत्वपूर्ण बदल केला आहे. वाचा सविस्तर नियम.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : म्हाडा लवकरच कोकण विभागात ११००० घरांसाठी लवकरच जाहिरात काढणार आहे. म्हाडा ११००० घरांसाठी लॉटरी काढून आचारसंहिता लागण्यापूर्वीच लॉटरी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, मुंबईत म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. घर खरेदीसाठी अर्ज करण्याच्या नियमात म्हाडाने महत्वपूर्ण बदल केले आहे.

म्हाडाने काय बदल केला?

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या घटस्फोटीत जोडप्यांना डिक्री प्रमाणपत्र सादर करणे आता बंधनकारक असणार आहे. म्हाडाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यामुळे म्हाडाने ॲप आणि संगणक प्रणालीमध्ये देखील आवश्यक बदल केले आहेत. नवीन नियम लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई आणि कोकण बोर्डाच्या सोडतीपासून लागू करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना पती-पत्नीच्या एकत्रित कौटुंबिक उत्पन्नाचा विचार केला जातो. काही अर्जदार दोन पैकी फक्त एकाचे उत्पन्न दाखवतात. त्यानंतर घरासाठी स्वतंत्र अर्ज करतात. संयुक्त कुटुंबाचे उत्पन्न लपवण्यासाठी आम्ही वेगळे झाल्याचे सांगतात. कोर्टात केस सुरु आहे, असे उत्तर देऊन म्हाडाची दिशाभूल करण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे म्हाडाने अशा अर्जदाराला डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.

मुंबई म्हाडा मंडळाच्या गेल्या वर्षीच्या सोडतीत अशी एकूण 77 प्रकरणे निदर्शनास आली होती, अशा अर्जदारांवर म्हाडाकडून कारवाई देखील करण्यात आली आहे.

मुंबई कोकण विभागात ११००० घरांसाठी लवकरच जाहिरात

म्हाडाकडून प्रथमच मुंबई आणि कोकण विभागासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची जाहिरात काढली जाणार आहे. मुंबई दोन हजारांसाठी तर कोकण मंडळाकडून तब्बल ९००० घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामुळे मुंबईसह कोकण विभागातील तब्बल ११००० नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Health Side Effects: तुम्हीही रात्री चपाती खाताय, तर सावधान...

Healthy Soup: हिवाळा स्पेशल डिश; उत्तम आरोग्यासाठी बनवा 'हे' गरमागरम सूप

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Cleaning Hacks: कपड्यांवरचे चहाचे डाग कसे काढावेत? वापरा सिंपल ट्रिक

रोज सकाळी उठल्यावर करा ही ५ योगासने, आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT