Mumbai Metro Introduces Wristband Ticketing For Metro-1 Route No Need For Paper Or Mobile Tickets Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Metro-1: मेट्रोने टेन्शन केलं कमी; आता प्रवासासाठी मनगटी तिकीटाचा नवा पर्याय उपलब्ध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Metro-1 Ticket on Wrist

मेट्रोचा प्रवास सुखकर व्हावायासाठी एमएमओपीएलकडून विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या जाताता. अशातच पुन्हा एकदा मेट्रोन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रोने नवीन सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यात प्रवाशांना प्रवास करताना कागदी तिकीट किंवा ई- तिकीट घेण्याची गरज भासणार नाही. त्याजागी आता मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. ही सुविधा सध्या मेट्रो मार्गीका १ साठी खुली करण्यात आली आहे.

वर्सोवा-अंधेरी -घाटकोपर या मेट्रो मार्गिकाने प्रवास करण्याऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अखेर बुधवारपासून (१० एप्रिल)पासून सुरु करण्यात आली.याच्या मदतीने मेट्रो स्थानकावर स्कॅन करुन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे तिकीटांसाठी रांगा लावण्याची गरज नाही तसेच वेळेचाही खोळंबा होणार नाहीये.

नेमकं कस आहे हे?

प्रवाशांसाठी सुरु करण्यात आलेल्या या सेवेचा मुख्य आकर्षण हे मनगटावरील बँड आहे. हे बँड एखाद्या घड्याळाप्रमाणे दिसते. मेट्रो १ च्या मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर या हँड बँण्ड विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या पट्ट्याची किंमत २०० रुपये असून हा पट्टा सोयीनुसार रिचार्च करुन प्रवाशांना वापरता येईल. मुख्य म्हणजे याला बॅटरीची आवश्यकता नसणार आहे. तसेच या पट्ट्यामुळे त्वचेला कोणतीही इजा होणार नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

या मनगटी तिकीटाचा पर्यायाची संकल्पना एमएमओपीएलने बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली आहे. हा पट्टा सिलिकॉनचा वापर करुन तयार करण्यात आलेला आहे. आता या सेवेला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो असा प्रश्न एमएमओपीएला पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT