चर्चेच्या फेऱ्या सुरु, घोळ संपता संपेना, भाजप शिंदेसेनेचे इच्छूक गॅसवर?

Last 48 Hours Left BJP–Shinde Sena: राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलंय.. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे 2 दिवस बाकी असतानाही भाजप आणि शिंदेसेनेच्या बैठकांचं सत्र सुरुय... आतापर्यंत 207 जागांवर एकमत झालं असून 20 जागांवर तिढा कायम आहे....मात्र चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उदय सामंतांनी दिलीय.
Senior leaders of BJP and Shinde Sena during crucial seat-sharing talks ahead of municipal elections.
Senior leaders of BJP and Shinde Sena during crucial seat-sharing talks ahead of municipal elections.Saam Tv
Published On

दुसरीकडे मुंबईतील जागांचा तिढा सोडवण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकांचा सिलसिला सुरुय.. मात्र आतापर्यंतच्या जागा वाटपाच्या चर्चेत नेमकं काय घडलंय?

मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 207 जागांवर भाजप आणि शिंदेसेनेचं एकमत झालंय... त्यात भाजपला 128 तर शिंदेसेनेला 79 जागा देण्यावर एकमत झालंय.. मात्र 20 जागांवर तिढा कायम आहे.. एवढंच नाही तर ठाणे महापालिकेतील 12 जागांवरही रस्सीखेच सुरु आहे.. त्यामुळे 10-15 जागांवर उमेदवारांची अदलाबदली करुन तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे..

मात्र जागा वाटपाचा घोळ फक्त मुंबई आणि ठाण्यापुरताच मर्यादित नाही... तर पुण्यातही भाजप आणि शिंदेसेनेत जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ कायम सुरु आहे.. त्यात अजूनही तोडगा निघाला नाही...त्यावरुन शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय..

हा तिढा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यापुरताच मर्यादित नाही... तर विदर्भातही जागा वाटपाचा घोळ कायम आहे... अमरावती महापालिकेसाठी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक झालीय.. त्यात तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आलीय... मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 48 तासही शिल्लक नसताना उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही... त्यामुळे इच्छूक गॅसवर आहेत... त्यामुळे तिढा असलेल्या जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर तोडगा निघण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com