Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता हवा : मावळ तालुका जमीन हक्क परिषद

एक्स्प्रेस वे वरील टोलनाक्याला उर्से टोलनाका असे नाव द्यावे आदी मागण्यांसाठी किसान मोर्चा व जमीन हक्क परिषद सातत्याने अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहे.
maval villagers demands service road at mumbai pune expressway
maval villagers demands service road at mumbai pune expressway saam tv

Maval :

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या (mumbai - pune expressway) दोन्ही बाजूला सेवा रस्ते करावेत या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेच्या वतीने मावळ तहसील कार्यालयावर (maval tashil office) शुक्रवारी (ता. 8) धरणे आंदोलन करण्यात आले. येथील पंचायत समिती चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Maharashtra News)

द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता करण्याची मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला गहुंजे ते कुसगाव (लोणावळा) पर्यंत महामार्गाच्या हद्दीतून सेवा रस्ते करावेत. द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित केलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना महामार्गावर नोकरी, उद्योग, व्यवसायात प्राधान्य द्यावे. एक्स्प्रेस वे वरील टोलनाक्याला उर्से टोलनाका असे नाव द्यावे, आदी मागण्यांसाठी किसान मोर्चा व जमीन हक्क परिषद सातत्याने अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहे.

maval villagers demands service road at mumbai pune expressway
Sangli : दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय आमच्या सरकारनं घेतला : मुख्यमंत्री

परंतु अद्यापही याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. सेवा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ महामार्गाचा वापर करीत आहेत. यात अपघात होऊन मृत्यु झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे द्रुतगती महामार्गालगत सेवा रस्ता व्हावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदाेलकांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Edited By : Siddharth Latkar

maval villagers demands service road at mumbai pune expressway
महाशिवरात्री 2024 : हर हर महादेव... शंभाे शिव शंकरा घाेषाने दुमदुमली राज्यातील मंदिरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com