Sangli : दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय आमच्या सरकारनं घेतला : मुख्यमंत्री

Shasan Aplya Dari : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाेलत हाेते.
cm eknath shinde speech at shasan aplya dari in ichalkaranji
cm eknath shinde speech at shasan aplya dari in ichalkaranji saam tv
Published On

CM Eknath Shinde News :

आमचं सरकार लोकांच्या बांधावर जाऊन काम करते. सिंचनाचे 120 प्रकल्प आम्ही घेतले आणि जमिनी ओलिताखाली आणले. शेतकऱ्यांच्या मागे उभा राहण्याचे काम सरकार करत आहे. केवळ पोकळ घोषणा करणारे आपले सरकार नाही. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय आमच्या सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी नमूद केले. इस्लामपूर (सांगली) येथे ‘शासन आपल्या दारी’ (shasan aplya dari) या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाेलत हाेते. (Maharashtra News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सांगली जिल्ह्याचे नाव काढले की डोळ्यासमोर येत प्रति सरकार. ज्यांनी इंग्रजांना सळाे की पळाे करून साेडलं हाेते. या सांगली जिल्ह्यातून अनेक सामाजिक आणि राजकीय नेते घडले.

शासनाच्या विविध योजना आहेत. त्या जनतेपर्यंत पाेहचाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहाेत. पूर्वी कामे हाेत नव्हती शासनाच्या याेजनांचे गरीबांना लाभ मिळत नसेल तर शासनाचा फायदा काय. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केला.

cm eknath shinde speech at shasan aplya dari in ichalkaranji
महाशिवरात्री 2024 : हर हर महादेव... शंभाे शिव शंकरा घाेषाने दुमदुमली राज्यातील मंदिरे

शासन आपल्या दारी म्हणजे काय तर घरी बसून काम होत नसतात. लोकांत जाऊन काम केले पाहिजे अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार लोकांच्या बांधावर जाऊन काम करते असे नमूद केले. ते म्हणाले सिंचनाचे 120 प्रकल्प आम्ही घेतले आणि जमिनी ओलिताखाली आणले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याचे काम सरकार करीत आहे. पोकळ घोषणा करणारे आपले सरकार नाही. सरकार आल्यावर पहिला निर्णय आमच्या सरकारने पाणी वळवण्याचा आम्ही निर्णय घेतला.

Edited By : Siddharth Latkar

cm eknath shinde speech at shasan aplya dari in ichalkaranji
Tarkarli : आधी राेजगार द्या! तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन घोषित, सरपंचासह ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदाेलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com